पोस्ट्स

महाकाल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १३६ : रेवा-माण-खेडी त्रिवेणी संगम । ऐसा फल कही नही मिलेगा !

इमेज
आजचा दिवस नर्मदा मातेच्या अनुभवांनी भारलेला असणार आहे याची मला पुसटशी देखील कल्पना नव्हती . मी आपला जलेश्वर महादेव सोडल्यावर काठाकाठाने चालू लागलो . एकटाच चालत होतो . पुण्याच्या दोघाही वीरांना माझा एकट्याने जाण्याचा संकल्प पटलेला होता . त्यामुळे त्यांनी काही आडकाठी केली नाही . अतिशय रम्य अशा किनाऱ्याने शांतपणे चालत राहिलो . हे वाहते पाणी नसून भरावाचे किंवा बॅक वॉटर चे पाणी असल्यामुळे खूप शांतता वातावरणात साचलेली होती . मोठ्याने आवाज करत उडणारी एखादी टिटवी तिचा भंग करायची . एरव्ही सर्व स्तब्ध आणि शांत ! अगदी आपल्या मनासारखे ! जसे वातावरण असते तसे आपले मन होते ! आपोआपच होते ! धांगडधिंगा करणारी गाणी लावली की मन चंचल होऊन जाते ! माझा एक मित्र होता जो रॉक म्युझिक ऐकायचा . त्याने मला त्यातले विविध प्रकार सांगितले होते . याच्यामध्ये हेड बँगींग नावाचा एक प्रकार असतो म्हणे ! म्हणजे तुम्हाला गाणे जितके जास्त आवडेल तितके तुम्ही डोक्याला जास्तीत जास्त झटके देऊन डोके जवळच्या कुठल्याही वस्तूवर आपटत राहायचे ! हा पठ्ठ्या कीबोर्ड वर डोके आपटायचा ! किती घोर विकृती आहे ! कुठे आपली थोर परंपरा आणि कुठे ही ...