पोस्ट्स

दूध धारा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक २६ : विदेही संत मीरा माई ने केलेला चमत्कार !

इमेज
कपिलधारा हे स्थान अतिशय मनोहर आहे .   उंच मेकल पहाडावरून नर्मदा मैया येथे अचानक खोल दरीमध्ये झेप घेते .  कपिलधारा जलप्रपात   केवळ चार ते पाच फूट रुंदीचे नर्मदा मातेचे पात्र मेकल पर्वतावरून झेपावते . अलीकडच्या काळामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये या पाण्याची पातळी फारच कमी होते . आणि पावसाळ्यात मात्र हे पाणी भरभरून वाहते . चातुर्मासात वाहणारी कपिलधारा कपिलधारेच्या थोडेसे अलीकडे दूध धारा म्हणून एक छोटासा प्रपात आहे . या स्थानाविषयी अनेक आख्यायिका आहेत . इथून पूर्वी दुधाची धार निघायची असे काही साधू सांगतात . तर भूगर्भ शास्त्रीय नियमानुसार चुनखडक अधिक असेल तर पांढऱ्या रंगाचे फेसाळ पाणी निघू शकते . पुढे अनेक ठिकाणी मला अशा दूध धारा दिसल्या . दूधधारेच्या जवळ काही ध्यान गुफा देखील आहेत . ध्यान गुफा दूध धारा दूध धारा दुर्वास ऋषींची ध्यान गुफा इथे परिक्रमा खंडित होऊ नये म्हणून परिक्रमा मार्गाचे फलक जागोजागी लावलेले आहेत . कपिलधारेकडे जाणारा वन मार्ग खालून कपिलधारा अ...