लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !
आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये क्षौर करणे याला फार महत्त्व आहे . कारण मनुष्य कसा दिसणार हे बव्हंशी आपल्या केशरचनेवर अवलंबून असते . केस विस्कटलेला मनुष्य अस्ताव्यस्त दिसतो व केसांची निगा राखणारा मनुष्य सुस्वरूप दिसतो हे उघड सत्य आहे . त्यामुळे जन्मापासून माणसाचे आपल्या केसांवर फार प्रेम असते . त्यामुळे आपल्या जवळ असलेल्या मायेचे प्रकट स्वरूप म्हणून केसांकडे पाहिले जाते व मायेचा त्याग याचे प्रतीक म्हणून सर्वप्रथम केसांचा त्याग केला जातो .
परिक्रमेदरम्यान पुन्हा केस व नखे यांना हात लावायला परवानगी नसते . परिक्रमा पूर्ण होईपर्यंत नखे व केस यांची मुक्त वाढ होऊ द्यायची असते .भारतात सर्वत्र ही प्रथा दिसते . अगदी दक्षिण भारतातील अय्यप्पाची यात्रा करणारे लोक किंवा आंध्रात श्रीशैल्यम मल्लीकार्जुनाचे महाशिवरात्र व्रत करणारे देखील ही प्रथा महिनाभर पाळतात . मी घाटावरती गेलो .अभिषेक त्रिपाठी नामक एका ब्राह्मणाने मला बोलावले व काय हवे विचारले .मी केश कर्तन करावयाचे आहे हे सांगितल्यावर त्याने शेजारून चाललेल्या राम लखन सेन नामक नाभिकाला हाक मारली व त्याचे सोबत मला पाठविले . माझ्या शहरी मेंदूला उगाचच अशी शंका आली होती की इथे 'कमिशन सिस्टीम ' दिसते ! राम लखन सेन शिडशिडीत बांध्याचा एक तरुण मुलगा होता आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती .त्याच्या मागे मी चालत राहिलो .
पुढील लेखांकचालत चालत तो मला न्हावी घाटावर घेऊन गेला .इथे भरपूर पायऱ्या होत्या व प्रत्येक पायरीवर बसून नाभिक यजमानांचे केस कापत बसले होते .कापणे कसले ? भादरणेच ते ! वस्तरा घेऊन झिरो कट मारणे सुरू होते ! अतिशय कमी वेळात कौशल्याने कुठलीही जखम होऊ न देता ते पटापट चमन गोटे करत होते !इतक्या मोठ्या प्रमाणात नाभिकांना तिरुपती नंतर पहिल्यांदाच पाहत होतो मी ! राम लखन मला म्हणाला पाचशे रुपये होतील .मी म्हणालो माझ्याकडे पैसे नाहीत . मग तो म्हणाला ठीक आहे २५१ रुपये द्या . मी म्हणालो अरे माझ्याकडे खरोखरच एकही रुपया नाही . हे सर्व करेपर्यंत त्याने मला एका उंच खुर्चीवर बसायची आज्ञा केली होती . निळ्या रंगाची मजबूत लाकडी खुर्ची होती आणि अतिशय उंच होती त्यामुळे उभ्या-उभ्या तो केस कापू शकत होता . मला म्हणाला ठीक आहे फोन पे करा.मी म्हणालो माझ्याकडे फोन सुद्धा नाही रे बाबा.आता मात्र थोडासा कठीण प्रसंग तिथे उभा राहिला.राम लखन सेन ने जोरजोरात ओरडून त्याच्या सर्व नाभिक बांधवांना सांगायला सुरुवात केली " अरे देखो भाईलोग ! इधर देखो ! ये बाबाजी परिक्रमा करने के लिए आए है । इनके पास एक रुपया भी नही है और मोबाईल भी नही है । " राम लखन सेनने अचानक केलेल्या या प्रकारामुळे मी भांबावून गेलो . मला एकप्रकारे त्याने बोलवून केलेला माझा तो अपमानच वाटला . टचकन् माझ्या डोळ्यात पाणी आले . मी डोळे गच्च मिटून घेतले .इतक्यात मला कोणीतरी पायावर डोके ठेवले आहे असे वाटले . म्हणून डोळे उघडून पाहिले तर माझ्यासमोर सर्व नाभिकांची रांग लागली होती .आणि ओळीने एक एक जण माझ्या पाया पडू लागला होता. मी चक्रावलो . हे सर्व अनपेक्षित असे होते . मी देखील प्रत्येकाला वाकून नमस्कार करू लागलो . परस्परो देवो भव ! राम लखन मला सांगू लागला , "बाबाजी यहा बहुत परिक्रमावासी आते है । लेकिन साथ मे पैसा मोबाईल सब कुछ लेके आते है । बहुत सालो के बाद कोई असली परिक्रमावासी मिला हमको । आपकी हजामत हम मफत करेंगे । आज मेरा बहुत अच्छा धंदा होने वाला है । मैया ने असली परिक्रमावासी की सेवा का मौका दिया । " मला मात्र हे काही पटेना त्यामुळे निदान पन्नास रुपये तरी याला द्यायला हवेत माझ्या मनात येऊन गेले . राम लखन सेन ने उत्तम पैकी क्षौर करून दिले . मला जो अपमान वाटला खरेतर तो मैय्याने केलेला सन्मान निघाला !
लेखांक सात समाप्त (क्रमशः)
मागील लेखांक
पुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवातिची प्रश्नपत्रिका आणि तीच परीक्षार्थी!
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏