पोस्ट्स

लेखांक १७० : बरबटीची गुप्तकुटी , पावसाचा हल्ला आणि उमाचरणदास जी महाराजांचे कुँडाकला

इमेज
 गुरु गुफा आश्रमामध्ये सन्यासी महाराजांनी मला सातूचे पीठ दिले आणि आता जा म्हणून सांगितले . त्यांना दंडवत प्रणाम केला आणि काठाने चालत चालत हिरापूर या गावी आलो . आता वाळू काढणारे नगण्य होत चालले होते . नावांचा आकारही बदलत चालला होता . त्याची रेखाचित्र काढून ठेवली आहेत . अशा नावा इथून पुढे सर्वत्र दिसतात . लांबुळक्या नावा बंद होतात . इथे हिरन नावाची नदी पार करावी लागते .ही नदी खूप मोठी आहे . आणि महत्त्वाची मानली जाते .समोरच्या तटावर इथेच एक परिक्रमावासी परिक्रमा उचलत होता त्याचे भोजन मिळाले होते . हिरन हथनी शेर अशी प्राण्यांवरून दिलेली नद्यांची मजेशीर नावे नर्मदा खंडामध्ये पाहायला मिळतात!  या नकाशामध्ये आपल्याला हिरन नदी आणि नर्मदा मातेचा संगम दिसतो आहे .समोर सांकल घाट आहे .जो शंकर घाट या शब्दाचा अपभ्रंश आहे .आपले गुरु गोविंद भगवत्पादाचार्यांना भेटायला आद्य शंकराचार्य दक्षिण भारतातून आले तेव्हा त्यांनी याच घाटावरून नर्मदा माई ओलांडली होती ! हिरन नदी संगमावरील एक अद्भुत दृश्य ! हिरण्य म्हणजे तेज ! हिरण्यगर्भा (रेवामाई ) , हिरण्य ( यति ) आणि  नदी एकत्र दिसत आहेत ! वाटेमध्ये अन...

लेखांक १६९ : आद्यशंकराचार्य त्यांचे गुरु श्री गोविंद भागवत्पादाचार्यांना भेटले ती गुरुगुंफा

इमेज
         दुधाचा चहा व बालभोग घेऊन निरंजन बाबांचा आश्रम सोडला आणि काठाने चालत केरपानी गावात आलो . गावात फारसे काही नव्हतेच त्यामुळे काठाने चालत चालत पुढे निघालो .इथे एक छोटासा पुल लागतो तो खालून ओलांडला .  आनंद मठाची टेकडी पार केल्यावर मैया पुन्हा सरळ होते . केरपानी गावाच्या पुढे मैया काही काळासाठी वायव्य वाहिनी होते . केरपानी गावाच्या जवळचा पूल . या भागात सर्वत्र संगमरवर असल्यामुळे महादेवाच्या पिंडी देखील संगमरवराच्या दिसतात पहाटेचे या भागातील मैयाचे दृश्य खूप सुंदर असते इथून पुढे काही किलोमीटर मैयाच्या काठी खूप चांगली शेती आहे . पिठेरा गाव ओलांडून डोंगर गावात पोहोचलो .या भागातील गावांची नावे मोठी विचारपूर्वक ठेवण्यात आलेली आहेत असे माझे लक्षात आले . आता हेच पहा ना या संपूर्ण भागात एकच डोंगर आहे म्हणून या गावाचे नाव डोंगरगाव ठेवले असावे . काल मी थांबलो ते हथिया गाव ,इथले दगड हत्तीच्या कातडी सारखे दिसतात . केरपाणी गावामध्ये वळण असल्यामुळे एका बाजूला मैयाच्या पाण्यातून वाहून आलेला केरकचरा साठतो . सकाळचा बालभोग पोटात असल्यामुळे आज भरपूर चालता आले . याबाबत सर्व...