पोस्ट्स

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला

लेखांक १३७ :ऋद्धेश्वर ते शुक्लेश्वराच्या दरम्यान झालेली लूट व कुब्जा संगमावरील प्राचीन मंदिरसमूह

इमेज
ऋद्धेश्वर मंदिर सोडल्यावर किनारा पकडला आणि नर्मदा मातेच्या अगदी जवळून चालायला सुरुवात केली . चालता चालता मनामध्ये विचार करत होतो . नर्मदा मैया कधीच सांगून दर्शन देत नाही . त्यामुळे तिच्या पाया पडता येत नाही . कधीतरी हिने सांगून दर्शन द्यावे ! म्हणजे मग तिचे पाय धरता येतील . कोणी जर मला नर्मदा परिक्रमे मध्ये चालताना पाहिले असते तर ठार वेडा समजले असते ! कारण मी जे काही मनात येईल तो सर्व संवाद नर्मदा मैयाशी थेटपणे साधायचो . अगदी हातवारे करून बोलायचो ! आता सुद्धा मी नर्मदा मातेशी बोलायला सुरुवात केली , " मैय्या तू अशी का आहेस ? तुझ्याशी संवाद साधावा म्हटले तर तू समोर उभी हवीस ना ! परंतु तू तर कधीच सांगून दर्शन देत नाहीस ! काहीतरी मोठा उपक्रम करतेस आणि मग नंतर लक्षात येते की अरे बहुतेक ही नर्मदा माई होती ! परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते . ते काही नाही . जर तू माझ्यावर प्रसन्न असशील माझी परिक्रमा योग्य मार्गाने सुरू असेल तर कुठल्यातरी रूपाने समोर येऊन मला तसे सांगशील . किंवा माझ्यावर अप्रसन्न असशील आणि माझे काही चुकत असेल तर ते देखील समोर येऊन मला सांगशील . " मैया चे पाणी संथ