पोस्ट्स

लेखांक १५८ : बुधनी , बगलवाडा ,बंगाली बाबा , बांद्राभान अन बनेट्यापासून सुरु नर्मदामातेची कमान

इमेज
बुधनी हे गाव अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे . मला नर्मदा परिक्रमेची प्रेरणा ज्या पुलावरून झाली तो पूल याच गावातून जातो ! समोरच्या तटावर नर्मदापुरम हे महानगर आहे . या भागात अनेक नद्या नर्मदा मातेला येऊन मिळतात . भागनेर , तिंदरी , गदरिया ,चांदनी , कुसुमेली अशा अनेक नद्या आणि असंख्य ओढे नाले नर्मदा मातेला याच भागात समर्पित होतात . लहानपणापासून मी ऐकत आलेले नाव वर्धमान धागे यांचे मुख्यालय किंवा मुख्य कारखाना बुधनी गावातच आहे . परिक्रमा मार्गावरती तो लागतो . इथे सतत मोठ मोठे ट्रक थांबलेले असतात .  वर्धमान फॅब्रिक्स कंपनीचे मुख्य प्रवेशद्वार जगातील सर्व महत्त्वाच्या कापड उद्योगांना कच्चामाल पुरवण्याचे काम ही कंपनी करते आहे . वर्धमान फॅब्रिक्स कंपनीचे एक वैशिष्ट्य आहे . भारतातील एकूण कापड उद्योगाच्या एक तृतीयांश व्यवसाय ही एकटी कंपनी करते ! १,५५० यंत्रमागांसह, वर्धमानची विणकाम क्षमता २२० दशलक्ष मीटर प्रतिवर्ष आहे आणि कापड प्रक्रिया क्षमता १८० दशलक्ष मीटर प्रतिवर्ष आहे. (वरील सर्व माहिती वर्धमान फॅब्रिक्सच्या संकेतस्थळावरून साभार ) हा माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा मतदारसंघ आहे .त्या...