पोस्ट्स

लेखांक १४१ : पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांनी बांधलेला जगातला सर्वात सुंदर घाट , महिष्मती अर्थात महेश्वर घाट !

इमेज
कधी एकदा महेश्वरचा घाट बघतो असे मला झाले होते . समोर असलेल्या शालिवाहन गावातून जेव्हा मी हा घाट पाहिला तेव्हाच त्याच्या प्रेमात पडलो होतो ! नावडा टोली इथून एकाने माझे फोटो काढताना सुद्धा मागे हा घाट ठेवला होता जो माझ्या लक्षात राहिला होता . इतका सुंदर घाट जवळून बघण्यासाठी माझे डोळे आसुसलेले होते .त्यामुळे वेगाने अंतर तोडत महेश्वर शहरामध्ये प्रवेश केला .हे मध्य प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ आहे . त्यामुळे इथे कायम पर्यटकांचा राबता असतो . गाडीने परिक्रमा करणारे लोक देखील खलघाट च्या पुला नंतर थेट इथेच पोहोचतात . त्यामुळे हा भव्य घाट कायम लोकांनी गजबजलेला असतो . आम्ही चालत सर्वप्रथम पंढरीनाथ आश्रमामध्ये पोहोचलो . पंढरपूरच्या पांडुरंगाचे सुंदर असे मंदिर येथे आहे . समोर गरुड आहेत . इथे अतिशय थकलेले आणि वयस्कर बहुधा मराठीच असणारे एक साधू सेवा देत होते . त्यांचे नाव अरुण महाराज असे होते .हा आश्रम डोंगरे महाराजांनी स्थापन केलेला आहे असे कळाले .महाराजांनी आग्रह केल्यामुळे इथे भोजन केले . आश्रम अतिशय साधा परंतु शिस्तबद्ध होता . मंदिराच्या शेजारी भोजनाची व्यवस्था होती .अनेक ...