पोस्ट्स

लेखांक १२७ : कानबेड्याचे मन्नुभाई जैस्वाल , कवांट चा नीलकंठेश्वर आणि वाजेपूरची बावडी

इमेज
भाखा आश्रमातील सर्व साधू एकेक करून झोपू लागले . कडकडीत दुपार होती . भयंकर ऊन पडले होते . सूर्य जणू आग ओकत होता . तशा उन्हातच मी पुढे निघालो . माझा एक संकल्प होता की परिक्रमेमध्ये दुपारी अजिबात झोपायचं नाही . कारण माझे झोपेवर नियंत्रण नाही ! ओंकारेश्वर च्या पूर्वी सकाळी झोपून रात्री उठल्याचा अनुभव लक्षात होता ! तसे काहीतरी होऊन नर्मदा परिक्रमेचे दिवस कमी करायचे नव्हते . प्रत्येक क्षण जागृती मध्ये घालवायची इच्छा होती . त्यामुळे तशा उन्हातच पुढे निघालो . पोटामध्ये सुरू झालेले पचन म्हणजे एक मोठे अग्नीकुंडच असते . उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म असेच त्याला म्हटलेले आहे . उलट आयुर्वेद तर असे सांगतो की जेवण झाल्याबरोबर काही काळ वज्रासनामध्ये शांत बसावे . तत्पूर्वी आपल्या डोळ्यांना पाणी लावावे आणि पायावर देखील पाणी घ्यावे . त्यामुळे आपल्या शरीरात समान पद्धतीने पसरलेल्या अग्नीला अशी सूचना मिळते की आपल्याला आता पोटाकडे कूच करायची आहे . आणि पचनक्रिया सुलभ होते . परंतु नेमके अशाच वेळी आपण भरपूर पाणी पोटामध्ये घातले तर मात्र अग्नी संपूर्ण शरीरामध्ये पसरतो आणि उत्पात माजवतो ! हनुमंताने रावणाची लंका जशी